Uncategorized

सेवानिवृत्त प्रा.महादेव कांबळे यांचे ८ मार्च रोजी झाले दुःखद निधन


करमाळा : यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी पर्यवेक्षक श्री.महादेव विठ्ठल कांबळे यांचे ८ मार्च २०२५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. प्रा.महादेव कांबळे हे माढा तालुक्यातील पिंपळखुंटे या मूळ गावचे असून ते सन-
१९८८ मध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात सेवेत रुजू झाले आणि सन- २०१९ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांची सहकार आणि अकौटन्सी या विषयामध्ये तज्ञ प्राध्यापक म्हणून ओळख होती . तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ,पुणे बालभारती या ठिकाणी सहकार विषयाच्या इयत्ता अकरावी व बारावी पुस्तक निर्मितीचे कार्य ६वर्षांपासून करत होते. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे यांच्या १२ वी सहकार विषयाच्या पेपरचे पेपर सेटर म्हणूनही त्यांनी १२ वर्षे काम पाहिले.

त्यांनी आपल्या सेवेच्या कालावधीमध्ये सहकार विषयामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणारे व अकौन्टसी विषया मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणारे विद्यार्थी घडवले . सेवानिवृत्तीनंतर मोफत क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अकौन्टसी विषयाचे अध्यापन केले. विद्यार्थी त्यांना अकौन्टन्सी विषयाचा बादशहा असे संबोधत होते.त्यांच्या जाण्याने यशवंत परिवार व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी हळहळ व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button