
पोस्टाचा अपघात विमा उतरवलेल्या झरे येथील गोकुळ जाधव यांच्या वारसदारास केला धनादेश सुपूर्त
करमाळा : इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या वतीने बजाज अलियान्झचे अपघात विमा योजनेंतर्गत झरे(ता. करमाळा) ,येथील मयताचे नातेवाईकास २० लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.
या योजनेत केवळ ५५७ रुपयामध्ये मृताचे वारसदारास १० लाख रूपयाचे सुरक्षा कवच दिले जाते. मागील वर्षी झरे गावातील पोस्ट ऑफिस मार्फत गावातील नागरिकांचा अपघात विमा उतरविण्यात आला होता. मे २०२४ मधे उजनी धरण परिसरात झालेल्या अपघातात झरे गावातील रहिवासी कै गोकुळ जाधव आणि कै कोमल जाधव यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांनी पोस्ट ऑफिस चा अपघात विमा उतरवला होता . अपघाती निधन झालेल्या गोकुळ दत्तात्रय जाधव यांच्या कुटुंबीयांना करमाळा तालुक्याचे तहसीलदार शिल्पा ठोकडे तसेच IPPB सोलापूर ब्रांच मॅनेजर विनायक पासंगराव ,पंढरपूर विभाग डाक अधिक्षक चंद्रकांत भोर, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव ,सरपंच सौ. मुसळे , बजाज अलायंझ जनरल इन्शुरन्सचे विकास अधिकारी नितीन राऊत तसेच वैशाली कोकिळ शाखा डाकपाल .यांच्याहस्ते झरे येथे गोकुळ द. जाधव यांचे वारस (वडील) दत्तात्रय जाधव यांना १० लाखाचा धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी करमाळा डाक उपविभागाचे प्रमुख राहुल जाधव आणि कर्मचारी त्याचबरोबर समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.

तहसीलदार ठोकडे मॅडम यांनी डाक विभागाचे आभार मानले आणि अशा योजनांचे महत्त्व अधोरेखित केले . तसेच या योजनेचा प्रचार प्रसार तालुक्यात करण्याचे आश्वासन दिले .
भोर यांनी गावातील ग्रामस्थ तसेच करमाळा तालुक्यातील नागरिकांनी अपघात विम्यासोबतच पोस्ट विभागाच्या विविध योजनांचा जसे पोस्टल जीवन विमा , सुकन्यासमृद्धी योजना , पीपीएफ, बचत खाते लाभ घ्यावा असे आवाहन केले .