
आमदार नारायण पाटील यांनी पत्रकार विशाल घोलप यांना नव्या बस समोर नारळ फोडायला देऊ दाखवला स्वतःच्या मनाचा मोठेपणा
करमाळा : करमाळा आगारामध्ये सगळ्याच बस खराब अवस्थेत असून आता पाच नवीन बसेस दाखल झाल्या आहेत.त्यामुळे करमाळा येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना समाधान वाटत असल्याची दिसत आहे .नवीन बस दाखल झाल्यानंतर बसचे पूजन आणि उद्घाटन करण्यासाठी आमदार नारायण पाटील उपस्थित होते. दरम्यान नारायण पाटील यांनी स्वतः नारळ फोडून उद्घाटन न करता त्या ठिकाणी उपस्थित असलेले पत्रकार विशाल घोलप यांना नारळ फोडण्याचा मान दिला.
आमदार नारायण पाटील यांनी स्वतः नारळ फोडून बसचे उद्घाटन न करता खऱ्या अर्थाने करमाळा आगारातील बसची अवस्था मंत्री, लोकप्रतिनिधी, प्रशासनासमोर आणून देणाऱ्या पत्रकाराला उद्घाटन करायला सांगून आमदार नारायण पाटील यांनी अप्रत्यक्षरीत्या पत्रकार विशाल घोलप यांना श्रेय दिल्याचे दिसून आले.
आमदार नारायण पाटील यावेळी घेतलेल्या भूमिकेमुळे स्वतःच्या मनाचा मोठेपणा दिसून आला.

विशाल घोलप यांनी करमाळा आगारातील बस राज्यामध्ये कोठेही बंद पडली असता. करमाळा आगाराच्या गलथान कारभार याविषयी जनतेसमोर मंत्र्यांसमोर आणि लोकप्रतिनिधींच्या समोर त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर वेळोवेळी आणून दिले . बस कुठेही बंद पडली असता करमाळा एसटी आगार येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या अगोदर जनतेपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम विशाल घोलप हे करत होते. घोलप यांनी निदर्शनास आणून दिलेल्या करमाळा आगाराच्या गलथान कारभाराविषय आवाज उठवत असल्याबद्दल बऱ्याचदा त्यांचे कौतुक केले जायचे. दत्तकलाचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी पत्रकार दिनाच्या दिवशी विशाल घोलप यांचा विशेष सन्मान केला होता. विशाल घोलप यांनी करमाळा आगारा विषयीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील बसेसची अवस्था काय आहे हे देखील दाखवून देण्याची काम केले.