
नाळेवस्ती येथील जि.प.शाळेमध्ये जागतिक महिला दिन संपन्न ; पैठणीचे मानकरी संगिता नाळे,सविता नाळे,पूजा नाळे
करमाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाळेवस्ती येथे जागतिक महिला दिनानिमित्त खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे प्रमुख मान्यवर म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ कविता कांबळे,पोलीस उपनिरीक्षक मस्के मॅडम, एडव्होकेट अपर्णा पदमाळे , विहाळचे सरपंच सौ पूजा मारकड, विस्तार अधिकारी मिनीनाथ टकले , विस्तार अधिकारी नितीन कदम , केंद्र प्रमुख आदिनाथ देवकते , विषय तज्ञ कैलास जाधव उपस्थित होते .

मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्तावीक मुख्याध्यापक संतोष पोतदार यांनी केले . खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे स्पर्धा अनुराधा शिंदे,मनिषा आव्हाड, अनारसे मॅडम यांनी संगीत खुर्ची, बादलीत बॉल टाकणे , ऊखाणे घेणे, बाटलीत पाणी भरणे हे खेळ घेण्यात आले.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे , डॉ कविता कांबळे , एपीआय मस्के , पदमाळे मॅडम यांचे हस्ते प्रथम तीन क्रमांकाना पैठणी, द्वितीय क्रमांक जेवणाचे डबे,तृतीय क्रमांक मेकअप बॉक्स देण्यात आले .

यावेळी प्रमुख पाहूण्यांनी खेळाचा आनंद घेतला .डॉ कविता कांबळे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन केले . तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना तहसीलमध्ये कामे भरपूर असताना ही नाळेवस्तीसारख्या छोटया शाळेत हा कार्यक्रम घेतल्याबद्दल मुख्याध्यापक संतोष पोतदार , शिक्षीका अनुराधा शिंदे यांचे अभिनंदन केले .महिलादिनानिमित्त खेळ आयोजित करून महिलांना आनंद घेता आला त्याबददल कौतुक केले . यावेळी प्रमुख मान्यवरांचे हस्ते आय डीबीआय बँक शाखा करमाळा यांनी शाळेस संगणक दिलेले होते . संगणक कक्षाचे उदघाटण करण्यात आले . सर्व ग्रामस्थ , सर्व महिला मोठया संख्येने उपस्थित होते . शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष , ग्रामस्थ , युवक मित्र उपस्थित होते . सर्वाना भोजनाची सोय ग्रामस्थांनी केली होती .आभार अनुराधा शिंदे यांनी मानले .