शैक्षणिक

शाळेची गुणवत्ता चांगली राखल्यास शहरातून सुद्धा विद्यार्थी ग्रामीण भागात शिक्षणासाठी जाऊ शकतात हे दाखवून देणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नामदेव माने यांचे निधन

करमाळा : करमाळा येथील सेवानिवृत्त जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक नामदेव माने (वय ७४) यांचे निधन आज दि.११ मार्च रोजी दुपारी झाले. माने हे सेवेमध्ये असताना आपल्या उपक्रमशिलतेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील खडकेवाडी गावच्या जिल्हा परिषद शाळेचे नाव राष्ट्रीय स्तरापर्यंत नेले. शाळेची गुणवत्ता चांगली राखल्यास शहरातून सुद्धा विद्यार्थी ग्रामीण भागात शिक्षणासाठी जाऊ शकतात हे त्यांनी सर्वांना दाखवून दिले.
शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी असंख्य लोकांना पोस्टाच्या आरडी.च्या माध्यमातून बचतीची सवय लावली. आज हजारो नागरिकांना बचतीची सवय लागलेली आहे.
करमाळा शहरांमध्ये गुणवत्तापूर्ण प्राथमिक शाळा असताना देखील करमाळा शहरातून अनेक विद्यार्थी खडकेवाडी येथे शिक्षण घेण्यासाठी बसच्या माध्यमातून जात असत.
माने गुरुजी यांचा मनमिळावू स्वभाव असल्यामुळे त्यांच्या जाण्याने सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे. नामदेव माने गुरुजी हे मिलिंद माने यांचे वडील होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button