Uncategorizedशैक्षणिक

स्वावलंबन, कायदा आणि आरोग्य याविषयी किशोरींना झाले मार्गदर्शन ; पंचायत समिती करमाळा,शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय किशोरी मेळावा संपन्न

करमाळा : तालुकास्तरीय किशोरी मेळावा संपन्न : पंचायत समिती शिक्षण विभाग करमाळा यांचे वतीने कमला भवानी सांस्कृतिक सभागृह श्रीदेवीचामाळ येथे आयोजित करण्यात आला होता . कार्यकमाचे अध्यक्ष ७वीची जि प शाळा जातेगाव येथील विदयार्थीनी तनिष्का शिंदे होती .

प्रमुख पाहूणे म्हणून करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस सहाय्यक निरीक्षक गिरीजा म्हस्के, डॉ सुनीता दोशी , एड. अपर्णा पदमाळे , योग शिक्षक बाळासाहेब नरारे, योग शिक्षिका , तथा उदयोजिका रेश्मा जाधव ,माजी सभापती अतुल पाटील , गटविकास अधिकारी डॉ अमित कदम उपस्थित होते .
प्रास्तावीक गट शिक्षणाधिकारी जयवंत नलवडे यांनी केले प्रमुख मान्यवरांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले . स्वागत गीत व ईशस्तवन सुरताल संगीत विदयालयाचे विदयाथ्र्यांनी केले हार्मोनियम बाळासाहेब नरारे , तबला वादन संतोष पोतदार यांनी केले . यावेळी शालेय गीते सादर करण्यात आली .बालीका प्रतिज्ञा श्रीम गुंजाळ यांनी म्हणून घेतली .


कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मुलींना स्वावलंबी बननेबाबत मार्गदर्शन केले .डॉ सुनीता दोशी यांनी मुलींच्या आरोग्याबाबत , अँड अपर्णा पदमाळे यांनी कायदयाचे तसेच एपीआय गिरीजा म्हस्के यांनी स्वतःचे यशाचे अनुभव कथन केले . सभापती पाटील यांनी मेळाव्यास शुभेच्छा दिल्या , गटविकास अधिकारी डॉ अमित कदम यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले बद्दल समाधान व्यक्त केले . वेशभुषा , सांस्कृतीक स्पर्धा , चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. ट्रॉफी व प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्तेदेवून सत्कार करण्यात आला . सर्वाना भोजन देण्यात आले . मुलींना फुगे वाटप करण्यात आले .विस्तार अधिकारी नितीन कदम , मिनिनाथ टकले , केंद्र प्रमुख वैशाली महाजन , वंदना पांडव , रमाकांत गटकळ , संजय मुंढे , अमृत सोनवणे , निशांत खारगे,साईनाथ देवकर , श्रीरामे , महेश्वर कांबळे , विश्वास निरवण , संतोष पोतदार , हरिष कडू , अंजली निमकर , विषय तज्ञ ढेरे, डीडी जाधव , कालिदास जाधव , गणेश मुंढे , बांगर , अशोक माने , रहिम शेख , शेंबडे ,सुत्रसंचलन श्रीमती शितल बिरंगळ , आभार केंदपमुख राजकुमार खाडे यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button