Uncategorized

छाया – प्रकाश फाउंडेशनचा ‘कला कौस्तुभ’ पुरस्कार दिग्दर्शक नागराज मंजुळे, शिक्षिका अनुराधा शिंदे यांना ; उद्या होणार सोलापूर येथे वितरण

करमाळा : सोलापूर येथील छाया – प्रकाश फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यामध्ये तालुक्यातील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे (जेऊर) आणि नाळेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका अनुराधा शिंदे यांचा समावेश आहे.
मंजुळे यांना कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल छाया – प्रकाश फाउंडेशनचा कला कौस्तुभ पुरस्कार घोषित झाला आहे. एक लाख रुपये आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. तर शिक्षिका शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल शिक्षिका गौरव पुरस्कार घोषित झाला असून पन्नास हजार रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सदर पुरस्कार वितरण शनिवार (दि. ९) रोजी सायंकाळी पाच वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे होणार आहे. अशी माहिती फाउंडेशनच्या सदस्या पुष्पा आगरकर यांनी दिली आहे. यावेळी ऍड. धनंजय माने, रवींद्र मोकाशी, प्रा. सुलभा पिशवीकर आदि उपस्थित होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button