Uncategorized

मनसेच्या पाठिंब्याने संजय मामा शिंदे यांची ताकद वाढली ; जनसामान्यांचा माणूस संजय बापू घोलप यांचा पाठिंबा


करमाळा : करमाळा तालुका मनसेचा संजय मामा शिंदे यांना पाठिंबा. संजयमामा शिंदे यांना विजयी करण्याचा केला निर्धार . करमाळा तालुक्यातील प्रशासनावर वचक असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संजय बापू यांचा करमाळा तालुक्यातील प्रशासनावर मोठ्या प्रमाणात वचक असून संजय बापू घोलप मनसेच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा, युवक,युवती, व्यापारी, वृद्ध नागरिक,महिला यांच्या अडचणी त्याचबरोबर अनेक प्रश्न सोडवण्याचे काम करत असतात.

त्यांच्या या कार्यामुळे संजय बापू घोलप यांच्या पाठीमागे असंख्य शेतकरी युवक,युवती, व्यावसायिक, वृद्ध नागरिक आहेत.
संजय बापू घोलप यांनी पाठिंबा दिल्याने याचा फायदा संजय मामा शिंदे यांना नक्की होणार आहे.
करमाळा तालुक्यातील नागरिक संजय बापू घोलप विधानसभेसाठी कोणती भूमिका घेणार ? कोणाला पाठिंबा? देणार याची प्रतीक्षा करत होते.संजय बापू घोलप यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन शनिवार दि.९ नोव्हेंबर रोजी केमिस्ट भवन येथे संजय मामा शिंदे यांना पाठिंबा संदर्भात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.यावेळी संजय बापू घोलप , संजय मामा शिंदे,नानासाहेब मोरे,सतीश फंड, सचिन कणसे, अमर करंडे, कन्हैयालाल देवी, विनय ननवरे तसेच पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button