Uncategorized

छगन भुजबळ यांचे बंधू बापूसाहेब भुजबळ करमाळ्यात झालेल्या बैठकीत काय म्हणाले ?नक्की वाचा…

करमाळा : आमच्या आरक्षणाला धक्का लागत असेल तर आम्ही गप्प कसे बसणार? आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर ओबीसीतून मागत असलेल्या आरक्षणाला विरोध आहे. असे उद्गार मा. ना. छगनराव भुजबळ यांचे बंधू ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष अखिल भारतीय समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ  यांनी काढलेे. दि. ६ जानेवारी २०२३ रोजी पंढरपूर येथे छगन भुजबळ यांची एल्गार सभा होणार आहे. या सभेला करमाळा तालुक्यातील  असंख्य कार्यकर्त्यांनी सभेस उपस्थित राहून छगन भुजबळ यांना पाठबळ देण्याचे आवाहन केले.
ओबीसी महाएल्गार मेळावा होणार आहे. या मेळाव्याच्या जनजागृतीसाठी ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष अखिल भारतीय समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथे आढावा बैठक झाली.
         

  पुढे बोलताना बापूसाहेब भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना साथ बाराबलूतेदारांचे होते. आमच्या रक्तारक्तात छत्रपतींविषयी आदर आहे. जरांगे पाटील हे स्वत:बोलत नसून त्यांच्या मागे असलेले पाठबळ बोलत आहे. ओबीसींच्या बाजूने लढणाऱ्या भुजबळांना पाठींबा देऊन ओबीसींनी आपली ताकद सर्वांना दाखवून द्या असेही ते म्हणाले.
    

  ओबीसी महाएल्गार मेळाव्यासाठी करमाळा तालुक्यातून दोनशे ते अडीचशे गाड्या जाणार आहेत. या बैठकीला सोलापूर जिल्हा समता परिषदेचे अध्यक्ष आबासाहेब खारे , करमाळा समता परिषदेचे अध्यक्ष प्रशांत शिंदे, महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दत्तात्रय अडसूळ,पंचायत समिती माजी सदस्य रोहिदास सातव,समता परिषदेचे तालुका उपाध्यक्ष शिवाजीराव बनकर, करमाळा तालुका समता परिषदेचे युवा अध्यक्ष सुभाषराव जाधव, पांडे गावचे सरपंच गोरखा अनारसे, सोमनाथ शिरसागर, अजित दुधे ,प्रवीण होगले, अंकुश हंडाळ ,सुभाष अभंग, नाना अनारसे,प्रवीण गायकवाड, अण्णा शिंदे, रासकर आदिजण पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button