आज ” सुर सुधा ” संगीत महोत्सवात डॉ. कविता कांबळे यांचा संगीत रसिक पुरस्काराने होणार सन्मान

या महोत्सवामध्ये सूरताल संगीत विद्यालयाचे विद्यार्थी आपली विविध कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर विविध राज्यातून आलेले कलाकार आपले गायन व नृत्य सादरीकरण करतील. संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच आलेल्या कलाकारांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.तसेच कलाकारामध्ये सरबानी सेन कोलकत्ता व चित्रलेखा गोगोई गुवाहाटी यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, डॉ. विधी नागर इंदौर व डॉ. मयुरा आनंद खटावकर मुंबई यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, स्नेहा रामचंद्र हैदराबाद व अर्पिता व्यंकटेश कोलकता यांना नृत्य शिरोमणी अवार्ड, काकली हजारिका गुवाहाटी व बनिता भांजा भुवनेश्वर यांना नृत्यसम्राज्ञी अवार्ड तर दीपिका बोरो गुवाहाटी यांना करमाळा नृत्य कला अवार्ड देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा आणि विद्या विकास मंडळ करमाळा या संस्थेचे सहकार्य लाभणार असून या महोत्सवासाठी रसिक व श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.

