Uncategorized

आज ” सुर सुधा ” संगीत महोत्सवात डॉ. कविता कांबळे यांचा संगीत रसिक पुरस्काराने होणार सन्मान


करमाळा : येथील सुरताल संगीत विद्यालयाच्या वतीने आज सायंकाळी ६ वाजता गुरुप्रसाद मंगल कार्यालय, दत्तपेठ येथे सुर सुधा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे उद्घाटन आमदार संजय मामा शिंदे यांच्या शुभहस्ते तर प्रमुख उपस्थिती म्हणून विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, यश कल्याणी सेवाभावी संस्थेचध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सहसंचालक दत्तात्रेय देवळे उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान गटविकास अधिकारी राजकुमार पाटील पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांना बा. सं नरारे महाराज जीवन गौरव पुरस्कार त्याचबरोबर डॉक्टर कविता कांबळे यांना करमाळा संगीत रसिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या महोत्सवामध्ये सूरताल संगीत विद्यालयाचे विद्यार्थी आपली विविध कला सादर करणार आहेत. त्याचबरोबर विविध राज्यातून आलेले कलाकार आपले गायन व नृत्य सादरीकरण करतील. संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच आलेल्या कलाकारांचा विविध पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.तसेच कलाकारामध्ये सरबानी सेन कोलकत्ता व चित्रलेखा गोगोई गुवाहाटी यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, डॉ. विधी नागर इंदौर व डॉ. मयुरा आनंद खटावकर मुंबई यांना करमाळा नृत्यभूषण अवॉर्ड, स्नेहा रामचंद्र हैदराबाद व अर्पिता व्यंकटेश कोलकता यांना नृत्य शिरोमणी अवार्ड, काकली हजारिका गुवाहाटी व बनिता भांजा भुवनेश्वर यांना नृत्यसम्राज्ञी अवार्ड तर दीपिका बोरो गुवाहाटी यांना करमाळा नृत्य कला अवार्ड देऊन गौरविण्यात येणार आहे.
हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी यश कल्याणी सेवाभावी संस्था करमाळा आणि विद्या विकास मंडळ करमाळा या संस्थेचे सहकार्य लाभणार असून या महोत्सवासाठी रसिक व श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button