ग्रामस्थांच्या मागणीला यश ;स्वातंत्र्यानंतर प्रथमच म्हसेवाडी गावासाठी सुरू झाली बससेवा…

करमाळा : आ. संजयमामा शिंदे यांनी जानेवारी २०२३ मध्ये करमाळा मतदारसंघाचा गाव भेट दौरा केला होता. या गावभेट दौऱ्यात गावकऱ्यांकडून आलेल्या विविध मागण्या,समस्या यावरती तोडगा काढून उपाययोजना करण्यासंदर्भात त्यांनी त्या त्या विभागाला सूचना दिलेल्या होत्या, त्या विभागाच्या बैठका घेतल्या होत्या. त्यानुसारच करमाळा मतदारसंघातील ज्या गावांमध्ये अद्यापही बस सेवा सुरू झालेली नव्हती अशा गावांमध्ये बस सुरू करण्यासंदर्भात आ. संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेले होत्या, त्यानुसार करमाळा – पांडे – म्हसेवाडी ही बस सेवा २०२४ च्या नवीन वर्षात दि.४ जानेवारीपासून सुरू झाली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.सदर बस चालू करण्यासाठी अंकुश पाटुळे आणि संतोष ननवरे यांनी विशेष पाठपुरावा केला.

नवीन बस सेवा सुरू झाल्या निमित्त बसचे चालक नागनाथ चव्हाण आणि वाहक बालाजी तुंदारे यांचा सन्मान ग्रामस्थांनी केला. याप्रसंगी
अर्जुननगर – म्हसेवाडी चे उपसरपंच मा.त्रिंबक भाऊ ननवरे, चंद्रकांत पाटुळे,पानाचंद बंडगर, भाऊसाहेब अडसुळ,अंकुश पाटुळे, सुनील लोखंडे,दिपक ननवरे,माधव पाटुळे,विलास ननवरे, अशोक लोखंडे, संतोष ननवरे, हरिश्चंद्र बंडगर,पोपट बिचकुले, नागनाथ ननवरे, अर्जुन खरात,खंडु ननवरे, रमेश ननवरे, दिपक लोखंडे, महादेव पाटुळे, अशोक ननवरे, सुदाम आदलिंग आबा पाटुळे आदी ग्रामस्थांसह विद्यार्थी उपस्थित होते.