Uncategorized

महात्मा गांधी शैक्षाणिक संकुलात इंग्लीश मेडीयम च्या चिमुकल्यांनी साकारल्या इको फ्रेंडली अन् आकर्षक पणत्या


करमाळा : दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला एम .जी . इंग्लीश मेडीयम स्कुल मध्ये ‘पणती महोत्सव ‘ उत्साहात साजरा… करमाळा तालुका एज्यूकेशन सोसायटी संचलीत एम .जी . इंग्लीश मेडीयम स्कुलमध्ये दि १८ आक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून प्रशालेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला .
या पणती महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापक बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते झाले . या प्रसंगी उपमुख्याध्यापक अनिस बागवान , पर्यवेक्षक रमेश भोसले , पर्यवेक्षिका सुनिता नवले , विज्ञान शाखा विभाग प्रमुख विजय पवार यांचे सह सर्व सहशिक्षक सह शिक्षीका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थीनी उपस्थित होते .
नवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या कृतीयुक्त अध्ययन अध्यापनाच्या उपक्रमांतर्गत स्कुलच्या चिमूकल्या विद्यार्थी – विद्यार्थीनींच्या कल्पकतेला व कला गुणांचा विकास , व्यवहार ज्ञान कळावे , प्रत्यक्ष मार्केट चा अनुभव ,व्यावसायिक कल्पकता , संवाद कौशल्ये , मेहनतीची जाणीव आदी उद्देश समोर ठेवून या ‘पणती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . या मध्ये सर्व नर्सरी , एल के जी , यु के जी व फर्स्ट स्टँडर्ड च्या चिमूकल्या विद्यार्थी विद्यार्थीनिंनी प्रत्यक्ष सहभाग घेतला . मार्गदर्शक शिक्षिकांनी त्यांना डेमो दाखवून पणत्या बनवण्याबाबत मार्गदर्शन केले . त्यानुसार चिमुकल्यांनी निसर्गास पूरक इको फ्रेंडली , माती, कागद इ च्या सुंदर पणत्या बनवण्याचा आनंद घेतला . बनवलेल्या पणत्या विक्रीसाठी स्टॉल ही उभारले होते . संकुलातील इतर वर्गांच्या विद्यार्थ्यांनी , शिक्षक – शिक्षीका , शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व पालकांनी कुतूहलाने पणत्या विकत घेतल्या .
हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी सौ .कोरडे मॅडम , सौ वायकर मॅडम , सौ दिवान मॅडम , सौ वीर मॅडम व शिलाताई मेकळकी यांनी परिश्रम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button