
Uncategorized
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, काॅग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजयराव पवार आ.संजयमामा शिंदे गटामध्ये लवकरच प्रवेश करणार
करमाळा : करमाळा तालुक्याच्या सर्वांगीण विकास आ.संजयमामा शिंदेच करू शकतात.त्यांचे नेतृत्व आपलेसे असून सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आ.संजयमामा शिंदे यांना विधानसभेसाठी पाठिंबा देण्यासाठी मा.राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी शहरअध्यक्ष, मा. जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष महाबीजचे माजी संचालक , बागल गटाचे व रणजितसिंह मोहिते पाटील यांचे समर्थक विजयराव पवार यांनी आमदार संजयमामा शिंदे गटात लवकरच जाहीर प्रवेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.