
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन टेल टू हेट प्रमाणे सुरू करण्याचे वेळापत्रक तयार : आमदार संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी :दिनांक ५ जानेवारी २०२३ पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन टेल टू हेड प्रमाणे सुरू झालेले असून सदर रब्बी आवर्तन २८ फेब्रुवारी रोजी संपणे अपेक्षित असतानाही ते आवर्तन अद्यापही सुरूच आहे. हेडकडील काही गावे अद्यापही रब्बी आवर्तनापासून वंचित आहेत.सदर गावांना १० एप्रिल पर्यंत पाणी देण्याचे नियोजन असून दिनांक ११ एप्रिल पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन टेल टू हेड याप्रमाणे सुरू होईल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
दि. ११ ते १४ एप्रिल : रोजी टेल चारीने घोटी आणि मलवडी.
———
दि. १५ ते १६ एप्रिल उजवी चारी क्रमांक ११ या चारीने निंभोरे.
———-
दि. १७ ते २२ एप्रिल रोजी चारी क्र.6 वरून घोटी, वरकुटे, साडे आळसुंदे.
———–
दि.२३ते २४ एप्रिल रोजी उजवी चारी क्रमांक १० वरुन निंभोरे.
———–
दि.२५ ते ३० एप्रिल रोजी उजवी चारी क्रमांक ९ या चारीवरून निंभोरे व लव्हे.
————
दि.१ मे ते ४ मे डावी चारी क्रमांक ४, थेट विमोचक ३ यावरून साडे व कोंढेज तलाव.
————-
दि. ५ ते ६ मे रोजी डावी चारी क्रमांक 3 वरून सौंदे ,साडे,फीसरे, सालसे ही गावे.
————–
दि.७ ते १० मे रोजी डावी चारी क्रमांक १,उजवी चारी क्रमांक ६ व थेट विमोचक क्रमांक १ वरून गुळसडी, कुंभेज, सरपडोह , शेलगाव क ही गावे तर
————–
दि.११ ते १३ मे उजवी चारी क्रमांक २ व देवळाली वितरीका यावरून देवळाली ,पांडे ,खडकेवाडी या गावांना पाणी मिळेल.
******************************
शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे : संजय अवताडे,उपअभियंता.
दहिगाव उपसा सिंचन योजना ही 2 टप्प्यातील उपसा सिंचन योजना असून या योजनेचे किमान विज बिल भरणा करण्यात इतपत पाणीपट्टी सध्या शेतकऱ्यांकडून आकारली जात आहे. ही पाणीपट्टी भरून शेतकऱ्यांनी सहकार्य करावे .दहिगाव योजना उन्हाळी आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर केलेले असले तरी लाईन ट्रिप होणे, पंप प्रॉब्लेम, एअर वॉल लिकेज या तांत्रिक बिघाडामुळे वेळापत्रकामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी.