उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे १८ जणांची झाली मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया;करमाळा येथे मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ गरजूंनी घ्यावा:वैद्यकिय अधिक्षक डाॅ.गजानन गुंजकर
करमाळा प्रतिनिधी:उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दि.२५जूलै २०२३रोजी १८ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी २० रुग्ण दाखल झाले होते परंतु दोन रुग्ण हे शस्त्रक्रियेसाठी अडचण असल्यामुळे दोन रुग्णांची शस्त्रक्रिया करता आली नाही. ही शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ. गजानन गुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डाॅ. गणेश इंदूरकर यांच्यासह जिल्हा नेत्र चिकित्सा अधिकारी डाॅ. खजूरगी,उपजिल्हा रूग्णालय करमाळा नेत्र चिकित्सा अधिकारी, डाॅ.अनिल खटके यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केली.
रूग्णांना शस्त्रक्रियेच्या एकदिवस आधी दाखल करून घेऊन नेत्र तपासणी केली. रक्त, इसिजी, तसेच इतर तपासणी करून जे रूग्ण शस्ञक्रियेसाठी पात्र आहेत अशा रूग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली. यावेळी तीन दिवस रूग्णांना सकस आहार देण्यात आला.शस्त्रक्रिया झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोतीबिंदू शस्त्रक्रियाझालेल्या डोळ्याची काळजी कशाप्रकारे घ्यायची याविषयी मार्गदर्शन डॉ. गजानन गुंजकर तसेच डॉ. अनिल खटके यांनी केले. त्यानंतर डोळ्याच्या सुरक्षिततेसाठी गॉगल देऊन रुग्णांना सोडण्यात आले.
दिसण्यास कमी आल्यास उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे दर बुधवारी व दर शुक्रवारी मोफत तपासणी करण्यात येतेे.ज्यांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे अशा रुग्णांनी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घ्यावी असे आवाहन वैद्यकिय अधिक्षक डाॅ. गजानन गुंजकर यांनी केले.
शस्त्रक्रिया दरम्यान आदिपरिचारीका सी. बी. शिंदे, परिसेविका व्ही. ए. ढाकणे , परिचर पावरा यांनी जबाबदारीने सेवा बजावली.