Uncategorized

अमृत भारत योजनेत जेऊर रेल्वे स्टेशनचा समावेश;गणेश चिवटे यांनी दिले प्रवाशाच्या सोईसाठीचे विविध मागण्यांचे निवेदन

करमाळा प्रतिनिधी : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्यानंतर जेऊर रेल्वे स्टेशनचा अमृत भारत योजनेत समाविष्ट केले आहे. त्यामुळे जेऊर रेल्वे स्टेशनसाठी जास्तीत जास्त निधी मंजूर करण्यात यावा;यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, रेल्वे प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील , करमाळा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुहास सूर्यवंशी,रवी माळवे यांनी सोलापूर येथे डी.आर.एम निरज डोहारे यांना भेटून जेऊर रेल्वे स्थानकास अमृत भारत योजने अंतर्गत प्लॅटफॉर्म निवारा शेड,कोच इंडिकेटर तसेच तिकीट खिडकी शेजारी दुसरा फुट ओव्हर ब्रिज तयार करण्यात यावा.या आशयाचे निवेदन दिले आहे.लवकरच जेऊर रेल्वे स्टेशन हे प्रवासांसाठी सर्व सोयी सुविधा युक्त होईल.तसेच तालुक्यातील प्रवाशांच्या प्रवासाठी सोयीची असणारी हुतात्मा एक्स्प्रेस ला लवकरच थांबा मिळवून देऊ असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले आहे.अशी माहिती भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button