क्रीडा

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थीनी श्वेता दळवी हिने खेलो इंडिया पिंच्याक सिलॅट कराटे स्पर्धमध्ये सिल्व्हरपदक मिळवत देशपातळीवर मिळवले नावलौकीक

करमाळा : श्वेता दळवी हिने खेलो इंडिया पिक्चर सिलेक्ट कराटे स्पर्धेमध्ये सिल्वर पदक मिळवत आपले नाव देश पातळीवर नेले आहे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेली श्वेता हिने वीर शिवाजी मार्शल चे संचालक नागनाथ बोळगे यांचे मार्गदर्शन घेत मिळवले आहे. करमाळा सारख्या ग्रामीण भागामध्ये वीर शिवाजी मार्शल आर्टच्या माध्यमातून बरेच विद्यार्थी राज्यसह देश पातळीवर यश मिळवत आहेत.
SAI स्पोर्ट अथॉरेटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या इंडिया पिंच्याक सिलॅट कराटे स्पर्धा मुंबई येथे सुरु आहेत. कु.श्वेता लक्ष्मण दळवी ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शिकत आहे. सिल्व्हरपदक मिळवत आपल्या महाविद्यालयाचे नाव, तालुक्यातच नव्हे तर देशपातळीवर उंचावले आहे.श्वेता हिचा आदर्श करमाळा तालुक्यातील विद्यार्थी नक्कीच घेतील. यशस्वी विद्यार्थिनीला क्रीडाशिक्षक उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक , प्रा.रामकुमार काळे , नागनाथ बोळगे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर , संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.बी.पाटील , उपप्राचार्य कॅप्टन संभाजी किर्दाक व सर्व वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button