आता आधुनिक चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात दिलमेश्वर येथून सुरू झाली आहे : यशपाल कांबळे
दिलमेश्वर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत पुस्तकांचे वाटप
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त दिलमेश्वर ता.करमाळा जि सोलापूर येथे “वारसा मि चळवळीचा” या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये यशपाल दादा कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे युवक जिल्हाध्यक्ष यांनी अत्यंत महत्त्वाचे मार्गदर्शन केले .मार्गदर्शन करत असताना यशपाल दादा कांबळे यांनी सांगितले की, खरंच आधुनिक चळवळीच्या नव्या पर्वाची सुरुवात दिलमेश्वर येथून सुरू झाली आहे असे मि जाहीर करतो .व हे दादांचे भाषणं चालु असताना अचानक दिलमेश्वरच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नागरिकांनी मांडला त्या वेळी यशपाल कांबळे यांना धक्का बसला त्यांनी त्यांचे भाषणं थांबवुन शासकिय अधिकारी यांना सर्व नागरिकांन समोर फोन करुन पाणी का बंद ठेवले असे विचारले आणि दोन दिवसांत पाणी चालु नाही झाले तर आम्हाला वेगळी भुमिका घ्यावी लागेल. असा इशारा या त्यांनी दिलेला लवकरच दिलेश्वर चे पाणी चालु करू असे आश्वासन दांदाना मुळे मिळाले आहे.तसेच या वारसा मि चळवळीचा या ऐतिहासिक कार्यक्रमात ज्ञानाची शिदोरी सोडताना यशपाल दादा कांबळे व विशाल भाऊ लोंढे आणि सर्व महिलांच्या हस्ते ज्ञानाची शिदोरी सोडण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुसेन पठाण सर यांनी केले.या वेळेस दिलमेश्वर सर्व नागरिक उपस्थित होते.
सतिश राक्षे, वैभव मस्के, अशोक नगरे, प्रकाश राक्षे, विनोद मारकड, राजेंद्र मल्लाव, नितीन मोरे, विजय शेवंते, महिलांन पैकी रेश्मा राक्षे, सुवर्णा नगरे,विद्या मारकड, जुलेखा,ऊशा चव्हाण पठाण,बायसाबाई राक्षे इ. मान्यवर उपस्थित होते. अतुल राक्षे यांच्या स्वाभिमानी संघर्ष निधीतुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.