लोकमंगल बँक व सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने मराठा उद्योजक मेळावा ; नव उद्योजक तरुणांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा :दिपक चव्हाण
करमाळा :
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनाबाबत लाभार्थी व बँक अधिकाऱ्यांशी संवाद करण्यासाठी महामंडळ थेट आपल्या दारी या संकल्पनेतून लाभार्थ्यांचे प्रश्न करमाळा येथे येऊन सोडवण्यासाठी करमाळा येथे लोकमंगल नागरी सहकारी बँक लिमिटेड सोलापूर व सर्वोदय प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता विकी मंगल कार्यालय बस स्टँड समोर करमाळा येथे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यास इच्छुक ग्राहकांचा “मराठा उद्योजक मेळावा “आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लोकमंगल नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ (महाराष्ट्र शासन उपक्रम )याचे अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र पाटील, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून महाराष्ट्र नॉलेज सेंटरचे समन्वयक तथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व संघटन मंत्री अभिजीत पाटील व प्रसिद्ध वक्ते माजी नगरसेवक अॅड. गजानन भाकरे हेही उपस्थित राहणार आहेत. तरी करमाळा तालुक्यातील सर्व नव उद्योजक तरुणांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक दीपक अरुण चव्हाण व शिवाजी रामचंद्र पाटील यांनी केले आहे…