Uncategorized

जि. प प्राथमिक शाळा, मांगीच्या विद्यार्थ्यांनी अनुभवला व्यापार ; बाल आनंद बाजार मेळाव्यात झाली मोठी आर्थिक उलाढाल


करमाळा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांगी बब विद्यार्थ्याचा बाल आनंद बाजार मेळावा आयोजीत करण्यात आला होता . सदर मेळाव्याचे उद्घाटन जेष्ठ नागरीक सुरेंद्र बागल , प्रा. काळे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश बागल , ग्राम पंचायत सदस्य सुजीत बागल , उपाध्यक्ष कल्पना राऊत , सदस्य प्रकाश ननवरे , सोनाली संचेती , राहूल अवचर , मुख्याध्यापक संतोष पोतदार , शिक्षक हिरामण कौले , सुवर्णा महामुनी , वैशाली पवार , आशा देमुंडे यांचे उपस्थित संपन्न झाला .

मा मुख्यमंत्री माझीशाळा सुंदर शाळा उपक्रमाचे संदेश पत्राचे वाचन सर्व पालकांचे उपस्थित करण्यात आले . यावेळी विस्तार अधिकारी सुग्रीव नीळ यांनी सर्व ग्रामस्थांना मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात सहभाग घेवून सर्वांनी सहकार्य करून स्पधेत उतरावे .केंद्रप्रमुख रमाकांत गटकळ यांनी बाल आनंद बाजार मेळावा व माजी विदयार्थी मेळाव्याचे आयोजन केलेबद्दल संतोष पोतदार यांचे अभिनंदन करुन उपक्रमाचे कौतुक केले . शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमेश बागल यांनी बाल आनंद बाजार उपक्रमामुळे विदयार्थ्यांना व्यावहारीक ज्ञानाची समज येवून खरेदी , विक्री , नफा तोटा विदयार्थ्यांना समजेल . ग्रामपंचायत सदस्य सुजीत बागल यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून कृतीतून शिक्षणामुळे विदयार्थ्याच्या ज्ञानात चांगली भर पडेल . अशा उपक्रमाची गरज आहे . मुख्याध्यापक संतोष पोतदार यांनी मा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात सर्वानी सहकार्य करणेबाबत आवाहन केले . यावेळी गणेश संचेती , सुहास कांबळे , युवराज दिवाण , पालखे , शिला अवचर सुदेश बागल , निलेश बागल , अमित बागल, आबा देशमाने , गणेश संचेती , राहूल अवचर , निखील बागल , अनिल नलवडे , अशोक गवळी उपस्थित होते .





Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button