जनसंपर्कात नसताना देखील भरपूर मत मिळाली : दिग्विजय बागल ; भविष्यात जनतेचा आमदार म्हणूनच कार्य करणार ; मिळालेल्या मतांवर बागल समाधानी
करमाळा : जनतेने दिलेला कौल मला मान्य असून मला पक्षाच्यावतीने त्याचबरोबर मित्र पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सहकार्य मिळाले. त्याबद्दल पक्षाचे तसेच मतदारांचे आभार असे मत शिवसेना शिंदे गट पक्षाचे उमेदवार दिग्विजय बागल यांनी केले. पुढे बोलताना दिग्विजय बागल म्हणाले की,मी विधानसभा निवडणुकीमध्ये जरी पराभूत झालो असलो तरी आमदार म्हणूनच मी जनतेचे प्रश्न सोडण्याचे काम करणार आहे.
जनतेच्या संपर्कात नसताना सुद्धा चाळीस हजार मते मिळवणे सोपी गोष्ट नाही. त्यामुळे जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. मिळालेल्या मतांमध्ये लाडक्या बहिणींची मोठी साथ मिळाली. भविष्यामध्ये शेतकऱ्यांचे, उद्योजकांचे, युवकांचे प्रश्न सोडवण्यावर मी भर देणार आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ताकद लावणार असून त्या त्यावेळी योग्य भूमिका घेऊन जनतेच्या समोर जाणार आहे.
आदिनाथ आणि मकाई यांची क्षमता वाढवून भविष्यामध्ये नावारूपाला आणणार आहे.
मी आता किंग मेकर च्या भूमिकेत नाही : विलासराव घुमरे
करमाळा तालुक्यात नवनवीन मेकर आल्यामुळे मी आता किंगमेकरच्या भूमिकामध्ये नसून पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये दिग्विजय बागल यांना आमदार करण्यासंदर्भात आम्ही यशस्वी वाटचाल करणार आहोत असे विधान बागल गटाचे मार्गदर्शक विलासराव घुमरे यांनी पत्रकार परिषदे दरम्यान केले.