
उपजिल्हाधिकारी शिंदे दांपत्यांनी रावगाव येथील जि. प .शाळेस दिला स्मार्ट टिव्ही; रावगाव गावात गुणवंत विद्यार्थी तयार होण्याची आशा

करमाळा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्वकांक्षी मुख्यमंत्री ‘माझी शाळा सुंदर शाळा’ या संकल्पने साद देऊन रावगावचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे आणि उपजिल्हाधिकारी सौ. स्वाती दाभाडे -शिंदे यांनी रावगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला दोन स्मार्ट टिव्ही भेट दिला.
रावगाव गावात गुणवंत विद्यार्थी तयार व्हावे यासाठी या दोन्ही अधिकार्यांनी शाळेला केलेली मदत वाखण्या जोगी आहे. त्यांचा आदर्श इतर अधिकार्यांनी घेणे सारखा आहे. असे झाल्यास महाराष्ट्रातील सर्व शाळेची मंदिरे सुंदर झाल्याशिवाय राहणार नाहीत असे मत यश कल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील कार्येकर्ते गणेश भाऊ करे पाटील यांनी व्यक्त केले.

गावच्या शाळेच्या शैक्षणिक सुधारणेसाठी आणि नव तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही नेहमी गावातील ग्रामस्थांन सोबत आहोत. असे आश्वासन उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे आणि उपजिल्हाधिकारी सौ. स्वाती शिंदे यांनी याप्रसंगी दिले.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी पाटील साहेब, विस्तार अधिकारी नीळ साहेब , केंद्र प्रमुख निर्णय साहेब, रावगाव च्या प्रथम नागरिक तथा सरपंच रोहिणी ताई शेळके, उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव, विष्णु गर्जे, सुभाष पवार, दादा पवार, प्रविण कांबळे, आदी सदस्य आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.