यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सी.ए. फाउंडेशनमध्ये यश
करमाळा : येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सी.ए. फाउंडेशनच्या परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी घेतलेली आहे. या महाविद्यालयातील ४विद्यार्थी सी.ए. फाउंडेशनच्या कोर्समध्ये यशस्वी झालेले आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी १) मीत खिलोशिया(३१५) २)मोहोळकर कुणाल(२२५)
३) माने अनिकेत(२५९) ४)गुंड मोहीत(२३६) तसेच कनिष्ठ विभागातील प्रा. नागनाथ भोसले सरांची कन्या अंजली भोसले(२३९) यांनीCA फाऊंडेशन परीक्षेमध्ये उतुंग यश संपादन केलेले आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव विलासराव घुमरे सर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील,संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, माजी उपप्राचार्य एम.व्ही. कांबळे यांनी केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहांमध्ये संपन्न झाला. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व वाणिज्य विभागातील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एम.डी. जाधव यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.लक्ष्मण राख यांनी केले तर आभार प्रा. सुरेखा जाधव यांनी मानले.