महात्मा गांधी विद्यालय पतसंस्था चेअरमनपदासाठी एकमेव अर्ज;प्रा.विजयकुमार पवार बिनविरोध
करमाळा प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थेच्या, महात्मा गांधी विद्यालय सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदाची निवड शनिवार दि .१५ जुलै रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय,करमाळा याठिकाणी पार पडली.त्यामध्ये नुतन संचालक प्रा.विजयकुमार पवार यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.सूचक म्हणून संचालक महेश कांबळे सर तर अनुमोदक म्हणून संचालक सचिन दळवे सर यांनी भूमिका पार पाडली.या वेळी नूतन संचालक आसिफ मुलाणी सर,अनिल हाके सर,संदिप पुजारी सर,शैलेश शेलार सर,प्रा.दत्तात्रय भागडे,रफिक खान सर इ.संचालक व संचालिका सौ सपकाळ मॅडम व प्रा . सुषमा बुद्रुक उपस्थित होते.विष्णू माने यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहीले.
त्यांच्या या निवडीनंतर संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव जगताप,करमाळा नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप ,प्राचार्य श्री. कापले सर उपप्राचार्य श्री. अनिस बागवान सर ,ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ.नवले मॅडम सर्व शिक्षक, शिक्षिका ,शिक्षिकेतर कर्मचारी,पतसंस्थेचे सचिव. प्रमोद गायकवाड सर यांनी अभिनंदन केले.