गायीच्या दुधाला मिळणार किमान ३४ रुपये प्रतिलिटर दर ; दूध उत्पादकाला आनंदाची बातमी
करमाळा प्रतिनिधी : राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघ यांना गायीच्या दुधाला किमान दूध दर ३४ रुपये प्रति लिटर निश्चित करण्यात आलेला असून हा दर दि. २१ जुलै २०२३ पासून लागू होणार आहे.
राज्यातील दूध दर प्रश्नाबाबत दूध उत्पादक शेतकरी संघटना व पशुखाद्य उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधी यांच्याबरोबर २२ जून २०२३ रोजी पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर बैठकीत दूध उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी यांनी दूधाच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला असल्याबाबत चर्चा केली. राज्यात दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी व सहकारी दूध संघांकडून करण्यात येते. दुधाच्या कृश काळात दूध उत्पादन कमी असल्याने, या दूधाला रास्त भाव मिळतो.तथापी दुधाच्या पुष्ट्ट काळात दूध उत्पादन वाढल्याने,खाजगी व सहकारी दूध संघाकडून शेतकऱ्यांचे दूध कमी दराने स्वीकारले जाते.यामुळे दूध उत्पादक शेतकरी तोट्यात जातो.वरील सर्वबाबी लक्षात घेता, खाजगी/सहकारी दूध संघांचा परिचालन खर्च तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च विचारात घेऊन,शेतकऱ्यांच्या दूधाला रास्त भाव मिळावा या अनुशंगाने दूधाला किमान दर ठरवण्यात आला.समिती गठीत करण्यात आली आहे.सदर समितीमध्ये सहकारी व खाजगी दुग्धक्षेत्रातील प्रमुख प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश आहे. सदर समितीने दि.३ जूलै रोजी बैठक घेऊन राज्यातील सहकारी व खाजगी दूध प्रकल्प यांचेद्वारे खरेदी होणाऱ्या ३.५/८.५ गुणप्रतिकरीता सर्वानुमते किमान खरेदी दर निश्चित करून शासनास शिफारस केली होती.सदर समितीने शासनास केलेली शिफारस विचारत घेता राज्यातील गायीच्या दूधासाठी (३.५/८.५)किमान खरेदी दरास मान्यता देण्याता देण्यात आली.शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.