महाराष्ट्र

जनस्वराज्य यात्रा माजी मंत्री महादेव जानकर यांचा करमाळा तालुक्यातील गावभेट दौऱ्या दरम्यान जंगी स्वागत

करमाळा प्रतिनिधी : रासपच्या जनस्वराज्य यात्रेनिमित्त माजी मंत्री आमदार महादेव जनकर यांनी करमाळा तालुक्यात गावभेट दौरा केला आहे.सोमवारी दि.१० रोजी पंढरपूर येथून निघालेल्या जनस्वराज्य यात्रेच करमाळा तालुक्यातील वरकुटे येथे स्वागत करण्यात आले. या दौऱ्याप्रसंगी आमदार महादेव जानकर साहेब म्हणाले की,रासप च्या वतीने येणाऱ्या सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहोत.प्रथम गण,गट आणि गटप्रमुखांची बांधणी करावी.

सध्या शेतकरी,कामगार,तरुन उपेक्षित आणि दिशाहीन होत आहे. राजकारणात तरुणांनी यायला पाहिजे. शेतकरी,कामगार आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे.काही पक्ष छोट्या पक्षांना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.या पुढे मतदारांनी आपलं मतदान न विकता चांगले पक्ष आणि चांगली माणसं निवडूण द्यायला हवीत.२०२४ला दिल्लीलाच जायचे हे माझे स्वप्न आहे.करमाळा तालुक्यातील यात्रे प्रसंगी माजी मंत्री महादेव जानकर साहेब म्हणाले.करमाळा तालुक्यातील वरकुटे येथे त्यांचे जंगी स्वागत केले.त्यानंतर अळसुंदे, सालसे, फिसरे, पांडे, धायखिंडी,खांबेवाडी,श्री देवीचामाळ येथे माजी मंत्री जानकर यांचे स्वागत केले.त्यानंतर पुढे करमाळा शहरातील भवानीनाका, एसटी स्टॅन्ड, दत्तमंदिर,कोर्ट रोड व सिद्धार्थनगर येथे जानकर यांनी भेटी दिल्या.त्यानंतर देवळाली,जेऊर, शेलगाव फाटा,पांगरे व कंदर येथेही त्यांनी ठिक-ठिकाणी भेटी व जोरदार स्वागत झाले.
यावेळी रासपचे प्रदेश अध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य सचिव सुशिल कुमार,मुख्य महासचिव माऊली सलगर,लेगंरे मामा, जिल्हा अध्यक्ष रणंजित सुळ,यु.प्रदेशअध्यक्ष आजित पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, जिल्हा सरचिटणीस अंगद देवकाते, तालुकाध्यक्ष जीवन होगले, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिनवडे, राहूल शिंदे, विठ्ठल भिसे, अल्पसंख्यांक आघाडीचे तालुकाध्यक्ष जहांगीर पठाण, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा शारदा सुतार, गणेश जगताप,लक्ष्मन शिंदे, वरकुटे चे सरपंच दादासाहेब भांडवलकर, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर सर,कंदरचे सरपंच भास्कर भांगे, ढोकरीचे सरपंच देवा पाटील,आ.माजी संचालक धुळाभाऊ कोकरे, भास्कर भांगे,आप्पा चौघूले, प्रवीण होगले, गणेश काकडे, विकास मेरगळ, रघुवीर खटके,जगनाथ सलगर, रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष सुहास सुर्यवंशी, प्रवीण करे, शंकर सूळ, सुहास ओहळ, बाळासाहबे टाकले, संतोष पाटील, नारायण शिंदे, बापू कोकरे, अमोल सुकळे, तानसिंग खांडेकर, शिवाजी देवकते, आदी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button