जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा करमाळा दौऱ्यावर ;स्व.मदनदास देवी यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट
करमाळा : जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आज दि. ११ आॅगस्ट रोजी करमाळ्यामध्ये स्व. मदनदास देवी यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी येणार आहेत.सकाळी १०.३५ वाजता पुणे विमानतळ येथून करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील हॅलीपॅडवर आगमन होणार आहे. सकाळी १०.४० ते दुपारी १२.४० या कालावधीत ते देवी यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. त्यानंतर दुपारी १ वाजता ते हेलिपॅडवरून पुणे विमानतळाकडे रवाना होणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे वरिष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे निधन वयाच्या ८१ व्या वर्षी बंगळुरु येथे झाले.
मदन दास देवी हे आरएसएसचे सह सर-कार्यवाह सुध्दा होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीवीपी) च्या राष्ट्रीय संगठन मंत्री पदाची सुध्दा जबाबदारी सांभाळली होती.
अशा या आरएसएसच्या वरीष्ठ व्यक्तीचे निधन झाल्यामुळे देवी यांच्या कुटूंबियांना भेटण्यासाठी जम्मू- काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने करमाळा येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.