श्रीराम प्रतिष्ठानच्यावतीने आज बांधकाम कामगार नोंदणी मेळावा मिळणारे फायदे… आणि नोंदणीसाठी लागणारे कागदपत्रे…नक्की जाणून घ्या…
करमाळा प्रतिनिधी : श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने करमाळा येथील भाजप भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय पुणे रोड गायकवाड चौक करमाळा या ठिकाणी आज रोजी सकाळी ९ वाजले पासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत नोंदणी मेळाव्याचे आयोजन केले आहे.
बांधकाम कामगारांना वेळेअभावी बांधकाम कामगार नोंदणी करता येत नाही ही अडचण लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे बांधकाम कामगारांसाठी शासनातर्फे बऱ्याच लाभदायी योजना आहेत परंतु नोंदणी अभावी या योजनेपासून बांधकाम कामगारांना वंचित राहावे लागते.
बांधकाम कामगार नोंदणी केल्यानंतर मिळणारे फायदे पुढील प्रमाणे
माध्यान्ह भोजन, बांधकाम कामगाराच्या विवाहासाठी ३० हजार रुपये अनुदान.बांधकाम कामगारास गरजेची वस्तू खरेदी करण्यासाठी ५ हजार रुपये अनुदान
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा मुलांना शिष्यवृत्ती
पत्नीच्या प्रसूतीसाठी २० हजार रुपये.कुटुंबीयांना गंभीर आजार झाल्यास एक लाख रुपये पर्यंत वैद्यकीय मदत.घर बांधकामासाठी साडेचार लाख रुपये मदत.
वारसास प्रतिवर्षी २४ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य.
संसार उपयोगी वस्तूंची पेटी.
नोंदणीसाठी लागणारे कागदपत्र पुढीलप्रमाणे
आधार कार्ड
रहिवास पुरावा
तीन फोटो
बांधकाम करत असतानाचे फोटो
९० दिवस काम केल्याचा पुरावा.
तरी करमाळा तालुक्यातील प्रत्येक बांधकाम कामगारा कामगारांनी आपली नोंदणी मेळाव्याच्या माध्यमातून करून घ्यावी असे आवाहन गणेश चिवटे यांनी केले आहे.