Uncategorized

विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणारे चळवळीतील कार्यकर्ते अॅड. आजीनाथ शिंदे यांचे निधन

करमाळा प्रतिनिधी : अॅड. आजीनाथ शिंदे यांचे निधन हृदय विकाराच्या झटक्याने बारामती येथे आज दि ६ आॅगस्ट रोजी पहाटे झाले. ते ५० वर्षांचे होते. शिंदे हे करमाळा न्यायालयामध्ये प्रॅक्टीस करत होते.
शिंदे यांनी छात्रभारती विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटले.भ्रष्टाचार विरोधी, व्यसनमुक्त कार्यक्रम, शैक्षणिक संस्थेच्या कारभारा विरोधात आंदोलने केली .डाॅ.नरेंद्र दाभोळकर, मेघा पाटकर, शिक्षक आमदार कपिल पाटील, डब्ल्यू एच ओ चे संचालक साहित्यिक डॉक्टर प्रदीप आवटे, दिव्य मराठीचे महाराष्ट्र राज्याचे संपादक संजय आवटे यांच्याबरोबर तसेच राष्ट्रीय पातळीवरील सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर त्यांना काम करता आले. काही महिन्यांपूर्वी शिंदे यांची जेडीयुच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड झाली होती. शिंदे यांनी करमाळा विधानसभा निवडणुक लढवली. त्यांनी वीरसेन देशमुख, गणेश टाक , अॅड. सविता शिंदे, अॅड. योगेश शिंपी, डाॅ. पंकज गांधी, कर सल्लागार उदय सुरवसे,अंकुश दळवी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक जी. एस. भोसले, लोकमतचे उपसंपादक जगदिश कोष्टी,पांडे येथील उद्योजक संपत जाधव,प्रसाद कुलकर्णी,दत्ता हिरडे, पुढारीचे उपसंपादक तानाजी बोराडे, प्रा. अनुपमा पोळ, प्रकाश पोळ,प्रतिभा कुलकर्णी, प्रा. शिवाजी दळवी, भैरवनाथ बोराडे, यांच्याबरोबर सामाजिक कार्य केले. त्याचबरोबर राजकीय पटलावर काम करताना करमाळा तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी वर काम केले.
त्यांच्या मागे पत्नी मुलगा,मुलगी,आई वडील, भाऊ भावजय तसेच सरकारी वकिल देवीदास शिंदे यांचे जेष्ठ बंधू असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button