युवक,नागरिकांमध्ये देशाप्रती देशभक्ती जागवण्यासाठी उपक्रम; करमाळा भाजपाचा आयोजित तिरंगा बाईक रॅली
करमाळा : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सालाबादप्रमाणे करमाळ्यात तिरंगा बाईक रॅली भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न झाली.सलग दोन वर्षे या रॅलीचे आयोजन करमाळा भाजपाच्या वतीने केले जाते.या रॅलीमुळे युवक,नागरिकांमध्ये देशाप्रती देशभक्ती जागवण्यासाठी या उपक्रमाची मोठी मदत होत आहे.रॅलीची सुरवात गायकवाड चौक,भाजपा कार्यालय येथून सुरु झाली.गायकवाड चौकातून किल्लाविभाग-वेताळपेठ-फुलसौंदर चौक-मेन रोड-जय महाराष्ट्र चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक -सुभाष चौक-संगम चौकातुन पुणे रोड ने पुन्हा भाजपा कार्यालय येथे या रॅलीची सांगता झाली.रॅली सुरवात सर्व महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून झाली.शहरातील या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी केले. या रॅलीत करमाळा भाजपा पदाधिकारी रामभाऊ ढाणे,जितेश कटारिया, संजय घोरपडे, बाळासाहेब कुंभार, अमोल पवार,अफसर जाधव,डॉ.अभिजित मुरूमकर,नितीन झिंजाडे, किरण शिंदे, सोमनाथ घाडगे, विनोद महानवर,विठ्ठल शिंदे,हरिभाऊ झिंजाडे, डॉ.अभिजीत मुरूमकर, मोहन शिंदे, दासाबापु बरडे,धर्मराज नाळे,जयंत काळे पाटील,बापु तनपुरे, हर्षद गाडे,मोहन शिंदे,संकेत दयाल,कृष्णा देशपांडे,रोहित कोळेकरहरि आवटे,दादा गाडे,दिपक गायकवाड,वसिम सय्यद, भैय्या कुंभार, मयुर देवी,आतिष दोशी, अजित सोळंकी,अनिल देवी,बंडू दोशी, अशोक मोरे, प्रदिप ढेरे महाराज, जांबुवंत शेळके,पांडुरंग लोंढे, बापु मोहोळकर,नितीन निकम,हर्षद शिंगाडे, नाना अनारसे,दादा देवकर,भैया गोसावी, नितीन कानगुडे,कमलेश दळवी, आप्पा खटके, यासह अनेक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.