न्यु साई समर्थ पब्लिक स्कुल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
करमाळा : जिंती ता.करमाळा येथील न्यु साई समर्थ पब्लिक स्कुल मध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील ध्वजारोहण बारामती अॕग्रोचे उसपुरवठा अधिकारी सुहास पवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर केसकर हे होते. यावेळी सास्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये मुलांनी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर केले.यावेळी माजी सरपंच रामभाऊ येडे,कुंडलिक वारगड, प्रताप हाके ,मस्कू हाके,मनोज शेजाळ,पप्पू मुलाणी,उध्दव वारगाड, अमर केसकर , माउली शिंदे,भिवा सरक, शाम केसकर,मल्हारी माळवदकर,नवनाथ वारगड, पाराजी अंबोधरे,डाॕ.प्रविण चाकणे,डाॕ.नितीन मेरगळ,गणेश पडळकर,रविंद्र हाके,विलास जगताप,हनुमंत भोसले,बबलू भोसले,भाऊसाहेब भोसले,ज्ञानेश्वर दिंडकर,बाबासाहेब गारगुंड,अमित लाळगे,पांडुरंग वारगड,विठ्ठल धुमाळ,नागनाथ ओंभासे,अजिनाथ गिरंजे,हनुमंत शिंदे,सतिष शेजाळ, गंगाराम शेजाळ, शहाजी शेजाळ,मारुती शेजाळ , कविता केसकर ,सुवर्णा भोई,आसमा मुलाणी,मोनिका केसकर ,पायल केसकर,संतराम केसकर आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सुलोचना केसकर
यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.वर्षा झांजुर्णे यांनी केले तर आभार प्रदर्शन जनाबाई मोरे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी मुख्याध्यापिका सौ.सपना चाकणे, सौ.मेरगळ, समाधान काळे,आदीत्य केसकर ,पियुष केसकर यांनी परिश्रम घेतले.