प्रा.बाळासाहेब नरारे आर्ट ऑफ लिविंगच्या शिक्षक पदासाठी पात्र; आता संगीता बरोबर योगाचे ही देणार धडे
करमाळा :सुरताल संगीत विद्यालयाचे संस्थापक प्रा. बाळासाहेब नरारे हे श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या शिक्षक पदासाठी पात्र झालेले आहेत बाळासाहेब नरारे हे १४ वर्षापासून आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षण घेत आहेत. नरारे यांनी बेंगलोर येथे १५ दिवसांचे निवासी शिबीर केले.
आर्ट ऑफ लिविंग चे संस्थापक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांनी विविध वंश, परंपरा, आर्थिक आणि सामाजिक स्थिती आणि राष्ट्रीयत्वाच्या लोकांना एकत्र केले आहे. १८० देशांमध्ये कार्यरत असलेली संस्था आहे.”प्रेम आणि ज्ञान, द्वेष आणि हिंसाचारावर विजय मिळवू शकतात.” हा संदेश केवळ एक घोषणा नाही, तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून परिणामांमध्ये रूपांतरित केला आहे आणि केला जात आहे.आर्ट ऑफ लिव्हिंग असंख्य, अत्यंत प्रभावी शैक्षणिक आणि स्वयं-विकास कार्यक्रम आणि साधने ऑफर करते जे तणाव दूर करण्यास सुलभ करतात. ही साधने सर्व व्यक्तींसाठी खोल आणि गहन आंतरिक शांती, आनंद आणि कल्याण देखील वाढवतात.या कार्यक्रमांनी, ज्यामध्ये श्वासोच्छवासाची तंत्रे, ध्यान याचा गोष्टींचा समावेश असून ;जगभरातील लाखो लोकांना त्यांचे जीवन पूर्णपणे बदलण्यास मदत केली आहे.
महामंगल न्यूज शी बोलताना बाळासाहेब नरारे म्हणाले की, गेली १४ वर्षापासून आर्ट आॅफ लिविंगशी सलग्न असून आता आर्ट आॅफ लिविंग टिचर पदास पात्र झाल्यामुळे संगीता बरोबर योगाचे ही धडे देणार. संगीत आणि साधना केल्याने ईश्वर प्राप्ती होते. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सर्व समाजात प्रबलता निर्माण व्हावी. म्हणून प्रयत्न करणार आहे. आर्ट ऑफ लिविंग म्हणजे जीवन जगण्याची कला होय. श्री श्री रविशंकर यांचं स्वप्न आहे ते दिव्य समाज निर्मिती व्हावी. युवक वर्ग निर्व्यसनी आणि स्वयंपूर्ण बनावा यासाठी तन मनाने तसेच सेवाभावी वृत्तीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर्वांना सोबत घेऊन जायचे म्हणजेच संघच्छत्वम् .