कृषी

संस्मरणीय ठरलेली कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक यावेळी मात्र बिनविरोध ; जगताप गट पुन्हा सत्तेत

करमाळा प्रतिनिधी : गतवर्षी सर्वांसाठी संस्मरणीय ठरणाऱ्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी मात्र बिनविरोध झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील , धैर्यशील मोहिते पाटील यांनी जगताप ,बागल, पाटील या प्रमुख गटांना एकत्रित करण्यात यशस्वी झाले.
गत निवडणूकीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती वर सत्ता मिळवण्यासाठी पाटील गट ,बागल गट आणि जगताप गट हे मोठ्या चुरशीचे प्रयत्न करत होते. २५ वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पदी राहिलेले जयवंतराव जगताप हे गेल्यावेळी सत्तेपासून दूर राहीले. सभापती पदाची खुर्ची ही गेली होती. ऐनवेळी शिवाजीराव बंडगर यांनी बागल गटाशी हात मिळवणी करत सभापती पद मिळवले होते. त्यामुळे जयवंतराव जगताप यांना सभापती पदापासून दूर राहावे लागले होते . सत्तेसाठी टोकाच्या भूमिकेचा पवित्रा घेत निवडणूक पार पडली होती. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन सत्ता मिळवू अशी भूमिका घेणारे गट यावेळी मात्र बिनविरोध मा. सभापती जयवंतराव जगताप यांच्या हातात देतील आणि कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध होईल असे करमाळा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसह शेतकऱ्यांना देखील वाटत नव्हते परंतु येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा विचार करता रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी करमाळ्यातील मुख्य गटांना एकत्र घेऊन ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्व गटाशी समन्वय साधून आणि सर्वांना विश्वासात घेऊन ही निवडणूक बिनविरोध करत जयवंतराव जगताप यांच्या हाती सत्ता दिली.
त्यामुळे जयवंतराव जगताप यांची गेलेली सभापती पदाची खुर्ची पुन्हा एकदा मिळाली असून ते लवकरच सभापती पदावर विराजमान होतील.
नूतन संचालक मंडळ
सहकारी संस्था मतदारसंघ सर्वसाधारण :
१) जयवंतराव जगताप २ )शंभूराजे जगताप३ ) जनार्धन नलवडे ४ ) महादेव कामटे ५) तात्यासाहेब शिंदे ६ ) रामदास गुंडगीरे ७) सागर दोंड
ओबीसी :
१) शिवाजी राखुंडे
एनटी :
१) नागनाथ लकडे.
महिला :
१) सौ .शैलजा मेहेर २) सौ . साधना पवार ; ग्रामपंचायत सर्वसाधारण :
१)नवनाथ झोळ २ ) काशीनाथ काकडे .
अनुसूचित जाती जमाती :
१)बाळू पवार
आर्थिक दुर्बल घटक :
१) कुलदीप पाटील
व्यापारी मतदारसंघ :
१) परेशकुमार दोशी २) मनोजकुमार पितळे
माल /तोलार :
१) वालचंद रोडगे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button