राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीची शेअर्स विक्री सुरू :डॉ.विकास वीर
करमाळा प्रतिनिधी :भारत सरकारच्या दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याच्या प्रकल्पांतर्गत करमाळा तालुक्यातील स्थापन झालेली राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड करमाळा ही एकमेव कंपनी आहे. या कंपनीने गेल्या वर्षी पहिल्या टप्प्यात सप्टेंबर २०२२ अखेर ३८३ सभासद नोंदणी केली होती. वर्षभरामध्ये कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन अनेक शेतकऱ्यांकडून कंपनीच्या शेअर्स विक्री बद्दल विचारणा होत होती. त्यामुळे कंपनीची दुसऱ्या टप्प्यातील शेअर्स विक्री आज दिनांक २६ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होत आहे. शेअर शुल्क ५१००/- रुपये.विक्रीसाठी मर्यादितच शेअर्स उपलब्ध आहेत, त्यामध्ये महिलांना प्राधान्य राहील असी माहिती कंपनीचे अध्यक्ष डॉ.विकास वीर यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की,करमाळा तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधील तरुणांनी एकत्र येऊन राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड करमाळा या कंपनीची स्थापना केंद्र शासनाच्या धोरणानुसार तसेच नाबार्ड,कृषी विभाग यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या सहकार्याने २५ मे २०२२ रोजी केलेली आहे.
पहिल्या टप्प्यात ३८३ सभासदांची नोंदणी झालेली असून कंपनीने वरकटणे येथे कार्यालय सुरू केले आहे.नुकतेच करमाळा येथील आय.सी.आय.सी.आय बँकेच्या शेजारी ऍग्रो मॉल सुरू केलेला आहे. या ऍग्रो मॉलमध्ये एकाच छताखाली सर्व सुविधा शेतकऱ्यांना देण्याचे धोरण कंपनीने अवलंबिलेले आहे त्यानुसार जैन ,सह्याद्री अशा नामांकित कंपन्यांची डीलरशिप कंपनी ने घेतलेली आहे. ठिबक, स्प्रिंकलर, पीव्हीसी पाईप ,टिशू कल्चर रोपे,नामांकित कंपन्यांची कीटकनाशके ,बुरशीनाशके, रासायनिक खते, फवारणी पंप ई सुविधा सभासदांसाठी कंपनीने माफक दरात उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
कंपनीने केळी खरेदी विक्री सुरू केलेली असून विग्रो, ट्रायडेंट, एस.के या कंपन्यांची व्हेंडरशीप घेतलेली आहे. कंपनीने सभासद शेअर्स रकमेतून जमलेल्या २३लाख ६५ हजार भागभांडवलातून व्यवसायाला सुरुवात केली.वर्षभरात कंपनीचा १ कोटी १५ लाखाचा टर्नओव्हर झाला व १ लाख १ हजार रुपये कंपनीला निवळ नफा झाला. कंपनीने दुबई येथे केळीचा कंटेनरही यशस्वीपणे एक्स्पोर्ट केलेला आहे. केंद्र शासनाच्या १० हजार A.P.O अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही कंपन्यांची नोंदणी झाली आहे त्यामध्ये राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी अग्रस्थानी आहे .कंपनीच्या या कामाची दखल केंद्र सरकारने घेऊन १५ ऑगस्ट २०२३ रोजीच्या दिल्ली येथील लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण समारंभासाठी कंपनीला विशेष निमंत्रण देण्यात आलेले होते.राजे रावरंभा कंपनीचे वॉलमार्ट च्या अर्थसहाय्यातून पॅक हाऊस उभारणीचे नियोजन सध्या सुरू आहे. येणाऱ्या काळात सभासदांच्या ज्वारी, मका, उडीद, तूर, सोयाबीन आदी धान्यांची खरेदी विक्री केली जाणार असून त्यासाठी क्लीनिंग, ग्रेडींग, पॅकिंग व प्रोसेसिंग हे युनिट उभारण्याचे प्रस्तावित आहे.
कंपनी चा मूळ उद्देश शेतकऱ्यांचे हित जोपासणे हाच आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून अधिकाधिक उत्पादन घेणे, देश-विदेशातील बाजारपेठेला आवश्यक असलेला गुणवत्तापूर्ण माल तयार करणे, पिकांचे प्रोटोकॉल पाळणे ,डाग विरहित उत्पादन घेणे, रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवणे हा आपल्या कंपनीचा उद्देश आहे. कंपनीच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण रोपे , निविष्ठा माफक दरात उपलब्ध करून देणे, तसेच माती, पाणी परीक्षण करून रासायनिक खतांवरील अतिरिक्त खर्च कमी करणे, कृषी तज्ञांच्या मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे आदी उपक्रम कंपनीमार्फत राबविले जाणार आहेत. या कंपनीचे दुसऱ्या टप्प्यातील मर्यादित शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्या शेतकऱ्यांना कंपनीचे शेअर्स घ्यायचे आहेत त्यांनी करमाळा येथील आय.सी.आय.सी.आय बँके शेजारी कंपनी कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा.शेअर शूल्क ५१००/- रूपये आहे . संपर्क मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाधव यांच्याशी 9284660406 / 7519193232 या नंबरवर साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे.