श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सामुदायिक विवाहासाठी नाव नोंदणीचे आवाहन ; संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे
करमाळा – श्रीराम प्रतिष्ठान,करमाळा आयोजित सालाबाद प्रमाणे चालू वर्षी ही भव्य-दिव्य स्वरूपात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन १६ फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे,अशी माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.पुढे बोलताना ते म्हणाले की गेली दोन वर्षापासून आम्ही करमाळा तालुक्यातील व परिसरातील सर्व जाती-धर्मातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुला मुलींची लग्न श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत लावून देत आहोत.सन २०२३ मध्ये २१ व सन २०२४ मध्ये ३१ विवाह सोहळे आम्ही यशस्वी पार पाडले आहेत.या वर्षी आमचे हे तिसरे वर्ष असून आम्ही जास्तीत जास्त विवाह श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावणार आहोत.या विवाहामध्ये वधू-वरांना आवश्यक त्या माना पानाच्या सर्व सुविधा देणार आहोत.तसेच या विवाह सोहळ्यात वधू वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी सामाजिक,राजकीय व धार्मिक श्रेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नाव नोंदणी या ठिकाणी करा….
जि.एन .सि मिल्क सेंटरच्या करमाळा,
कोर्टी, वरकुटे, घारगाव येथील केंद्रावर
गायकवाड चौक करमाळा येथील भाजपा संपर्क कार्यालय व श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था दत्तपेठ करमाळा
या सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आव्हान गणेश चिवटे यांनी केले आहे