
प्रा.रामदास झोळ यांचे समर्थक ज्ञानेश्वर गलांडे यांची कोंढार चिंचोली ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून निवड
करमाळा : करमाळा तालुक्याच्या विकासासाठी प्रा रामदास झोळ हे राजकारणामध्ये सक्रिय झालेले असून करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत मध्ये आपली पकड मजबूत करण्याची सुरुवात कोंढार चिंचोली येथे उपसरपंच झालेले ज्ञानेश्वर गलांडे यांच्या निवडीवरून लक्षात येते.
ज्ञानेश्वर गलांडे हे प्रा. रामदास झोळ यांचे समर्थक आहेत . त्यावेळी त्यांचा सहर्ष सत्कार प्रा. रामदास झोळ सर व सौ. माया झोळ मॅडम यांनी केला. यावेळी कोंढार चिंचोली गावचे सरपंच शरद भोसले, तसेच अनिल डफळे, प्रकाश गलांडे, मनोज साळुंखे, भरत लांडगे, चंद्रशेखर जगताप, ज्ञानेश्वर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना प्रा. रामदास झोळ म्हणाले की, करमाळा तालुक्यातील विविध समस्या जसे की वीज, रस्ते, पाणी त्याचबरोबर शिक्षण व आरोग्य ह्या सोडवण्यासाठी प्रा. रामदास झोळ सर परिवार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

यापुढे असेच आपण करमाळा तालुक्यात समाजकारणाबरोबर राजकारणहीतही सक्रिय सहभागी राहणार आहोत असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता जोमाने कामाला लागण्यास प्रा. रामदास झोळ सर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शित केले. इथून पुढे करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास सर्वांनी घ्यावा, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
अपयश ही यशाची पहिली पायरी असते. त्यामुळे यशाच्या शिखरावर पोहोचण्याकरिता आपणास करमाळा तालुक्यातील विविध समस्यांवर निवारण काढण्यास भर दिला पाहिजे. तसेच कुठल्याही गटा तटात न आटकता निस्वार्थपणे करमाळा तालुक्यातील समस्या सोडविण्यात सहभागी झाले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी कोंढार चिंचोली चे सरपंच श्री शरदजी भोसले व उपसरपंच श्री ज्ञानेश्वर गलांडे यांनी प्रा. रामदास झोळ सर व प्रा. माया मॅडम यांचे आभार व्यक्त केले.