Uncategorized

पाणी न आलेल्या बिटरगाव श्री येथील कॅनेलमध्ये पाणी आणण्यासाठी काम सुरु

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांगी तलावाच्या डाव्या कॅनलच्या बिटरगाव (श्री) येथील अनेक दिवसांपासून रखडलेल्या चारीबाबत आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकारी व शेतकरी यांची आज (शुक्रवारी) बैठक झाली. यामध्ये नंदकुमार दळवी यांच्या घरामागील ओढ्यावरचे सायपण तत्काळ दुरुस्त करण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बिटरगाव श्री येथे मांगी तलावातून डाव्या कॅनेलच्या माध्यमातून पाणी येणार आहे. मात्र नंदकुमार दळवी यांच्या घरामागील ओढ्यावरचे सायपण नादुरुस्त झाले आहे. त्याच्यापुढे पाणी येत नाही. त्यामुळे याची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. बिटरगाव श्री येथे लालासाहेब मुरूमकर व हंबीरराव मुरूमकर गुरुजी यांच्या बांधापर्यंत मजबूत चारी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वखर्चाने चारी खोदली होती. मात्र ती चारी बुजवण्यात आली आहे. या चाऱ्यांमध्ये करोडो रुपये खर्च होऊन आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊनही अदयाप एकदाही पाणी आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
चाऱ्या तयार असूनही पाणी न आल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष असून या चारीत पाणी आले तर शेकडो हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. उन्हाळ्यात या भागात पाणी तटंचाई निर्माण होते. त्यामुळे हा कॅनेल होणे आवश्यक आहे. या भागात अजूनही शाश्वत पाणी नाही. मांगी तलावातून पाणी आले शेती हिरवीगार होणार आहे. त्यामुळे या चारीत पाणी येणे आवश्यक आहे. या बैठकीत शेतकऱ्यांनी चारीचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. त्यावर सर्व प्रश्न समजून घेतल्यानंतर आमदार शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधून तत्काळ विषय मार्गी लावण्याबाबत सांगितले आहे.
आतापर्यंत या चारीत एखदाही पाणी न आल्याने अनेक ठिकाणी चारीत झाडे आले आहेत. ज्या ठिकाणी चारी नादुरुस्त आहे त्याची दुरुस्ती करण्याची मागणीही यावेळी केली आहे. दरम्यान चारीत पाणी सोडून काय अडचणी येत आहेत त्यावर मार्ग काढण्याबाबतही सांगण्यात आले आहे. या बैठकीला सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, विवेक येवले, पत्रकार अशोक मुरूमकर, गोकुळ दळवी, अतुल मुरूमकर, गजेंद्र बोराडे, अभिजित वाघमोडे, मधुकर कुलकर्णी, संतोष वाघमोडे, अनिल गवळी, गौतम दळवी यांच्यासह पाटबंधारे विभागाचे विजय झुंडरे व डॉ. विकास वीर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button