करमाळा तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रयत्न करणार : गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी :District Planning and Development Council म्हणजेच जिल्हा नियोजन समिती या समितीचे सदस्य असलेले भाजपाचे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे ते म्हणाले की, करमाळा तालुका विकासासाठी मी माझ्या पदाचा वापर करणार असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मिळवून तालुका विकास करणार आहे.
DPDC निधीतून गुळसडी जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी रू तीन लाख निधी मंजूर झाला आहे. सदर कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की सोलापूर जिल्हा नियोजन समिती मधून आज पर्यंत करमाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांसाठी तीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे, तसेच येणाऱ्या काळात जास्तीत जास्त निधी करमाळा तालुक्यासाठी मिळावा यासाठी प्रयत्न करणार.
यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, गणेश महाडीक, विनोद महानवर , गुरसळीचे सरपंच प्रमोद भंडारे, माजी सरपंच समाधान यादव, उपसरपंच योगेश भंडारे, ग्रामपंचायत सदस्य महावीर कळसे, आदम शेख, नारायण भोसले, पोलीस पाटील धनंजय अडसूळ, माजी उपसरपंच नवनाथ यादव, माजी सरपंच अनंत यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी खंडागळे, बापू मोहोळकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती जाधव, सामाजिक कार्यकर्ते सतीश बागल, श्याम पडवळे, पप्पू बागल, राज भंडारे शुभम लोंढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते,