कंदरच्या शिक्षिका रत्नमाला होरणे यांना ‘कृतीनिष्ठ शिक्षक’ पुरस्कार
करमाळा : शिक्षक सोलापूर जिल्हा शिक्षक समिती व छत्रपती परिवार, मरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा सन २०२३-२४ चा कृतीनिष्ठ शिक्षक पुरस्कार जि प प्राथमीक शाळा कंदर ता. करमाळा,जि.सोलापूर येथील शिक्षिका रत्नमाला होरणे यांना देण्यात आला श्रीमती होरणे यांची विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील, साहित्यिक,समाजप्रिय शिक्षिका म्हणून ओळख आहे.
पुरस्कार वितरण सोहळा दि. ३ मार्च २४ रोजी आप्पा श्री लॉन्स मंगळवेढा येथे आमदार समाधान अवताडे,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,अभयसिंह मोहिते , भगीरथदादा भालके, नूतन शिक्षणाधिकारी कादर शेख ,उपशिक्षणाधिकारी संजय जावीर गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे, प्रा. वनवाला भगरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
श्रीमती रत्नमाला होरणे यांनी शाळेमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेले असून त्यांचे सामाजिक शैक्षणिक साहित्य क्षेत्रामध्ये भरीव योगदान आहे त्यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत पुरस्काराचे निवड पत्र त्यांना शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांनी स्वतः शाळेमध्ये येऊन दिले
यापूर्वीही होरणे यांना विविध तालुकास्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत. पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे विविध क्षेत्रांमधून कौतुक केले जात आहे. करमाळा तालुक्याचे गट विकास अधिकारी मनोज राऊत, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील , शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस प्रताप काळे,
अल्पसंख्याक शिक्षक संघटना जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शेख,केंद्रप्रमुख साई देवकर, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती साळुंखे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दादासाहेब मुलाणी, सर्व सदस्य कंदर गावचे सरपंच मौलासाहेब मुलाणी,उपसरपंच अमर तात्या भांगे, ग्रामस्थ कंदर व शाळेतील आणि करमाळा तालुक्यातील सर्व शिक्षक वृंदांनी श्रीमती होरणे यांचे अभिनंदन केले आहे.