
महात्मा गांधी ज्यु.काॅलेजची विद्यार्थीनी सिमरन सय्यद फेरतपासणीमुळे ठरली करमाळा तालुक्यात अव्वल
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयातील इ १२ वीची विद्यार्थीनी सिमरन सय्यद हिने इंग्रजी विषयामध्ये मिळालेल्या गुणांवर आक्षेप घेत बोर्डाकडे फेर तपासणी करण्याची मागणी केली. त्यामध्ये सिमरन हिचे तब्बल ३ गुण वाढले. त्यामुळे तिला आता इंग्रजी विषयामध्ये ८५ गुण झाले आणि एकूण मार्क ५५२ झाले आहेत. सिमरन सय्यदला महाविद्यालयासह तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे.या अगोदर कु।मोहोळकर हिने ६०० पैकी ५५१ गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला होता.आता सिमरनने ६००पैकी ५५२ गुण मिळवत पहिल्या क्रमांकावर बाजी मारली.पहिले तिनही क्रमांक एक मार्काच्या फरकावर आहेत.
मिळालेल्या गुणांवर आक्षेप असल्यास विद्यार्थ्यांनी तात्काळ फेर तपासणीची मागणी केली पाहिजे. कारण एकाएका गुणासाठी स्पर्धा मोठ्या प्रमाणात आहे.
तिच्या या यशाबद्दल तिचे मा.आमदार जयवंतराव जगताप,नगराध्यक्ष वैभवराजे जगताप,खरेदी-विक्री संघाचे चेअरमन युवा नेते शंभूराजे जगताप,प्राचार्य कापले पी.ए,उपप्राचार्य बागवान अनिस,पर्यवेक्षक पाटील बी.के,पर्यवेक्षिका सौ नवले मॅडम,विभाग प्रमुख पवार व्ही एल व मार्गदर्शन करणारे सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका सर्वांनी तिचे अभिनंदन केले.