शैक्षणिक

एम.जी.इंग्लीश मेडियम च्या चिमुकल्यांनी बनवल्या इकोफ्रेंडली पणत्या

करमाळा : महात्मा गांधी विद्यालयात पणती महोत्सव साजरा.एम.जी.इंग्लीश मेडियम च्या चिमुकल्यांनी बनवल्या इकोफ्रेंडली पणत्या दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला महात्मा गांधी विद्यालय संकुलात यावर्षी सुरु झालेल्या इंग्लीश मेडीयम स्कुल मध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी नविन शैक्षणिक धोरण ( NEP ) नुसार व्यवसाय भिमूक व सर्जनशिलतेला वाव देणारे व कृतीयुक्त अध्ययनावर भर देणाऱ्या शैक्षणिक धोरणांचा अवलंब करत दिवाळी सण आठवडाभर जवळ आलेला असल्याने निसर्गपूरक कोणत्याही नैसर्गिक घटकास हानी न पोहचवता ‘ इको फ्रेंडली’ पणत्या बनवून त्या इतर विद्यार्थी व पालकांना विक्री करण्यात आल्या . या उपक्रमा मूळे विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कल्पकता,व्यवहारचातूर्य ,खरेदी,विक्री,नफा-तोटा , मेहनतीचे महत्व , संवाद कौशल्य , मार्केटचा प्रत्यक्ष अनुभव इ कलागुण वृद्धींगत होण्यास मदत होणार आहे . या पणती महोत्सवाचा एम .जी . इंग्लिश मेडियम च्या चिमूकल्या विद्यार्थ्यांसह महात्मा गांधी विद्यालय , तांत्रिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेज मधील विद्यार्थी – विद्यार्थीनिंनी तसेच शिक्षक शिक्षीका यांनी मोठ्या उत्साहाने पणत्या विकत घेतल्या . यावेळी मुख्याध्यापक अनिस बागवान , पर्यवेक्षक बाळकृष्ण पाटील,पर्यवेक्षिका सौ.नवले , विज्ञान शाखा विभाग प्रमुख विजय पवार, सर्व शिक्षक – शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button