केंद्रशाळा पोथरे येथे वाचन प्रेरणा दिन आणि हात धुवा दिन उत्साहात साजरा
करमाळा : जि.प. प्रा. केंद्र शाळा पोथरे येथे’
वाचन प्रेरणा दिन’आणि’हात धुवा दिन ‘ उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी डॉ.कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेतील विद्यार्थिनींच्या हस्ते करण्यात आले. मा.राष्ट्रपती अब्दूल कलाम आपले वेगळेपण दाखवून आपली देशभक्ती जागृत ठेवली.त्यांची जिद्द, चिकाटी, देशप्रेम,वाचनवेड, संशोधन या बाबी नक्कीच वाखाणण्याजोग्या होत्या.भारत महासत्ता बनवण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या युवापिढीवर आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचन केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने’वाचन प्रेरणा दिन’ साजरा केल्याचे सार्थक होईल.असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीतील शिक्षणतज्ञ श्री.दादासाहेब झिंजाडे सर यांनी केले.
डॉ. कलाम यांचे बालपण,आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील न खचता त्यांनी घेतलेले उच्चशिक्षण, त्यांचे संशोधन ,आकाश,नाग,त्रिशूळ,अग्नी इ. सारखी स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार करून आपल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने उचललेले महत्वाचे पाऊल,भ्रष्टाचारविरहित त्यांचे जीवन,त्यांचा साधेपणा युवापिढीसमोर त्यांनी निर्माण केलेला आदर्श इ.
बाबींची सविस्तर माहिती विषयशिक्षिका श्रीम. शगुफ्ता हुंडेकरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना दिली.
तर आजची उच्चशिक्षित आणि बुद्धीमान युवापिढी आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या देशासाठी न करता परदेशात करत आहेत.
मुख्याध्यापक श्री.गजेंद्र गुरव सर यांनी ‘हात धुवा दिन’चे महत्व सांगून स्वच्छतेच्या सवयी, स्वच्छ हात धुण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले.
यावेळी इ.१ली ते ७ वी च्या प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी सर्व वर्गशिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता तपासणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.आभारप्रदर्शन विषयशिक्षक दत्तात्रय मस्तूद सर यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीम.शाबिरा मिर्झा,श्रीम.स्वाती गानबोटे, श्री.बापू रोकडे,श्रीम.सविता शिरसकर या शिक्षकांनी परिश्रम घेतले.